
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :- झोंबिवली’ सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. “आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी! 26 जानेवारीला येतोय करून सगळी तयारी”, अशी पोस्ट करत अमेय वाघने सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
येत्या 26 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
यात सिनेमात अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत. काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणारा ‘झोंबिवली’ सिनेमाचा ट्रेलर आहे. ट्रेलमधील काही सीन भीतीदायक वाटतात तर काही संवाद मात्र हसायला भाग पाडतात. हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता हा चित्रपट फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे २६ जानेवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.