दै चालु वार्ता प्रतिनिधि
औरंगाबाद मोहन आखाडे
आधार कार्ड शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत होणारी अडचण तसेच काही किरकोळ चुका असलेल्या आधारकार्ड मुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेता विटखेडा वार्डात मा. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या संपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शेकडो लोकांनी नवीन आधार कार्ड बनवणे, मोबाईल लिंक करणे, आधार कार्ड दुरुस्ती करून घेतली. शिबिराचे उद्घाटन मा.महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते व माजी महापौर सौ.अनिताताई घोडेले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी भारतीय डाक विभागाचे वरिष्ठ आधीक्षक श्री. जी हरिप्रसाद, मार्केटिंग एक्सएकटीव्ह संजय पाटील, मनपा माजी विरोधी पक्ष नेते रावसाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख, वसंतभाई शर्मा, सतीश निकम शिवसेना विभाग प्रमुख सुरेश गायके समाजसेवक संजय खडके, भगवान गायकवाड, बाबासाहेब खडके, राजु बनकर,शिवसेना शाखाप्रमुख विक्रम पाटील खडके,गौतम सोनवणे,उद्धव खडके, निलेश पाटील,किशोर खडके निवृत्ती भानुसे प्रा. निघोटे, रवी जगदाळे बाळु साळवे,दीपक ढोणे, ज्ञानेश्वर खडके,अनिल वागलगावे,संजय पवार, आकाश धनेधर,अशोक जगदाळे, अशोक जगधणे, शुभम दाभाडे,सचिन भोळे, बबन भानुसे,योगेश खडके, मयुर कुमावत,सुरेश जंगले, आकाश भवर जेष्ठ शिवसैनिक गोरख आबा खडके, इंजिनीर लक्ष्मीकांत कोतकर, प्रा.माणिक राठोड, महिला आघाडीच्या, जयश्रीताई इंदापुरे, संगीता बनकर, पाडवे ताई, मंदा बनकर, मंगल दाभाडे, राधाबाई दाभाडे, युवासेने, ईश्वर जगदाळे, अजय ब्रम्हा, वैभव लिंगायत, सचिन आढाव, सचिन खडके, सागर जगदाळे, योगेश जगदाळे,इत्यादी ची उपस्तिती होती. श्री.हरिप्रसाद यांनी पोस्टाच्या विविध योजनाची माहिती दिली तसेच विटखेडा वॉर्डात पोस्टाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना राबवण्याची घोषणा केली.