दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
महाराष्ट्र राज्य माळी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शनिवार दि.४/६/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता तळेगाव ढमढेरे येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीसाठी माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज कार्य करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या बैठकीत ओबीसी आरक्षण, पुणे येथील भिडे वाड्याच्या प्रलंबित विषयवार चर्चा व माळी समाज्यावरती राजकीय क्षेत्रात होणा-या कुरघोड्या वरती चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीला मुंबई हाय कोर्ट चे ॲड.नितीनजी राजगुरू, महेश भाऊ गोरे, मुरलीधर भुजबळ, रूपाली ताई रायकर, बापूसाहेब बोराटे, संजय जकाते, ज्ञानदेव शिंदे, राजेंद्र गोरे,भारतीताई आल्हाट, धनंजय जाधव, नंदाताई भुजबळ, गणेश गायकवाड, स्वप्नाताई लोणकर,मनोज गुंजाळ, वर्षाताई भोंग, वैशाली सिनलकर, बाळासाहेब झगडे,उमेश गायकवाड, सुनिल बनसोडे,लक्ष्मण शिंदे,किरण वाघ, महादेव शिंदे, संतोष कोरपडे, बापू गवळी, गणेश म्हेत्रे, प्रदिप देवकर, तेजस हेगडे, संदीप बारवकर,किरण बोराटे, अमोल बोराटे, प्रदिप शिंदे, दादासाहेब शिंदे, हरिदास राऊत, सचिन व्यवहारे,राम माळी, अशोक शिंदे, गणेश भुजबळ याबरोबरच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.