
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
31 मे 2022-23 पर्यंत एकूण उत्पादन 138 दशलक्ष टनांवर पोहोचले
वीज क्षेत्राला शाश्वत आधारावर पुरेसा कोळसा पुरवठा सुनिश्चित करणे
2021– 22 मध्ये 777 दशलक्ष टन (MT) विक्रमी कोळसा उत्पादन झाल्यानंतर, चालू आर्थिक वर्षातही देशांतर्गत कोळसा उत्पादनातही वाढ होत आहे. 31 मे 2022 रोजी 2022– 23 मधील एकूण स्थानिक कोळसा उत्पादन हे 137.85 मेट्रिक टन इतके होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील 104.83 मेट्रिक टन उत्पादनाच्या 28.6% अधिक होते. उत्पादनाची हीच गती जून 2022 मध्येही कायम राहिली. कोल इंडिया लिमिटेडकडून (सीआयएल) होणारे कोळसा उत्पादन त्याच कालावाधीतील आधीच्या वर्षातील (16 जून 2022 रोजी) उत्पादनापेक्षा 28% अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात स्थानिक कोळसा उत्पन्नाचे ध्येय हे 911 मेट्रिक टन आहे, जे मागील वर्षीपेक्षा 17.2 % अधिक आहे.
देशांतर्गत कोळसा आधारित (DCB) ऊर्जा प्रकल्पांद्वारे मिश्र वापर करण्यासाठी 2021 – 22 मध्ये कोळसा आयात ही 8.11 मेट्रिक पर्यंत घसरली आहे, जी गेल्या आठ वर्षांमधील सर्वात कमी कोळसा आयात आहे. हे सगळे केवळ देशांतर्गत स्रोतांकडून झालेला ठोस कोळसा पुरवठा आणि वाढत्या देशांतर्गत कोळसा उत्पादनामुळे शक्य झाले आहे.
2016 – 17 ते 2019 – 20 या कालावधीत आयात कोळसा आधारित (ICB) पॉवर प्लान्ट्सने दरवर्षी 45 मेट्रिक टन पेक्षा अधिक कोळसा आयात केला होता. तथापि, आयसीबी ऊर्जा प्रकल्पांद्वारे कोळशाची आयात 2021-22 मध्ये 18.89 मेट्रिक टनच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे आणि या प्लान्ट्समधून होणारी ऊर्जा निर्मिती देखील 2021 – 22 मध्ये 39.82 BU पर्यंत घसरली, ज्याच्या तुलनेत हे प्लान्ट 100 BU पेक्षा अधिक बऱ्याच काळापासून निर्माण होत आहेत. या वर्षी देखील आयात कोळशाची किंमत अधिक असल्याने यावर्षीही त्यांची निर्मिती खूपच कमी आहे.
गेल्या पाच वर्षात, कोळशावर आधारित वीजनिर्मिती 1.82 % च्या सीएजीआर जराने वाढली आहे तर वीज क्षेत्राला घरगुती कोळसा पुरवठा 3.26 % च्या सीएजीआर ने वाढला आहे. अशा प्रकारे, हा कोळसा पुरवठा ऊर्जा क्षेत्रासाठी पुरविला असताना त्यात ऊर्जा निर्मितीमध्ये वाढ झाली आहे आणि सध्याच्या वर्षातही ती सुरूच आहे.
16 जून 2022 पर्यंत विविध देशांतर्गत कोळसा खाणींमध्ये कोळशाचा साठा 52 मेट्रिक टनपेक्षा अधिक आहे, जो वीज प्रकल्पांच्या सुमारे 24 दिवसांसाठीच्या गरजेइतका पुरेसा आहे.
या व्यतिरिक्त सुमारे 4.5 मेट्रिक टन कोळशाचा साठा हा विविध गुडशेड साइडिंग्ज, खासगी वॉशरिज आणि बंदरांवर उपलब्ध आहे आणि तो ऊर्जा प्रकल्पांमध्ये नेण्याच्या प्रतीक्षेत आहे.