
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
भूम:-मात्रेवाडी ता.भूम जि. उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते,जांब ग्रामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक,दै. पुण्य नगरीचे पत्रकार मुकुंद अच्युतराव तमांचे(सुतार )वय 37 यांचे सोलापूर सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या कॅन्सरचे उपचार चालू आसताना निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, आई ,वडील, भाऊ, बहीण, आसा मोठा परिवार आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत शिक्षण पूर्ण केले. पत्रकार क्षेत्रामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा होता. कुटुंबाचा भार खांद्यावर घेतला व शिक्षण पूर्ण झाल्यावर जांब ग्रामपंचायत येथे संगणक परिचालक या पदावर नोकरी जॉईन केली व तुटपुंज्या मानधनावर घर सांभाळत बावी या ठिकाणी छोटेसे फोटो स्टुडिओ महा-ई सेवा केंद्र सुरू केले व गावामध्ये धार्मिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता वडिलान कडून पंढरपूर च्या वारीस वारसा मिळाला आणि गावात ग्रंथ वाचन पोती सांगणे वाचणे हे छंद होते हे छंद जोपासत नडेल त्याला मदत सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.