दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी . साताऱ्यातील एमआयडीसी परिसरांत घरगुती वादांतून सख्या काकाने आपल्या दहा महिन्यांच्या पुतण्यांला विहिरीत ढकलून खून केल्यांची घटना सातारा जिल्ह्यांत घडली सदरची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारांस उघडकीस आल्यांने या घटनेमुळे सातारा जिल्हा चांगलाच हादरला. याबाबत सातारा शहर पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांच्या मिळालेल्या माहितीवरुन सातारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दत्तनगर कोडोलीत दहा महिन्यांचे बाळ विहिरीत मृत अवस्थेत असल्यांची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सातारा शहर पोलीस पथक घटनास्थळी दाखल. विहिरीत सापडलेले बाळ हे (मयूर मारुती सोनवणे दत्तनगर कोडोली) यांच्या असून. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी घेतली असता मयूर सोनवणे यांचा सख्खा भाऊ अक्षय सोनवणे संशयित आरोपीने बाळाला चॉकलेट देतो असा बहाणा करीत बाळाला विहिरीत टाकून त्याचा खून केला असल्यांची माहिती पोलीस तपासात समोर आली.संशयित अक्षय सोनवणे याला आई-वडील त्रास देतात, तर भावाला चांगले म्हणतात म्हणजे बाळाच्या आई-वडिलांना या कारणावरुन भावाच्या मुलाला विहिरीत टाकून खून केला असल्यांची कबुली संशयित आरोपी मयूर सोनवणे यांनी सातारा शहर पोलिसांना दिली याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सदर आरोपीस अटक करुन त्याच्याकडे अधिक तपास करीत असल्यांची माहिती सातारा शहर पोलीस निरीक्षक श्री.भगवान निंबाळकर यांनी दिली.
Related Stories
2 days ago