दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
कै.व्यंकटराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित एज्युकेशनल पावर प्रि इंग्लिश स्कूल लोहा येथे अमृतमहोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.
प्रथमतः संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत देशभक्तीपर गीतांनी, नारेबाजी करत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.तसेच विद्यार्थ्यांसाठी भाषणं व रैलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी संजय पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव टिंगरे व अश्विनी ताई सचिन चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व विद्यार्थ्यी,पालक व शाळेचा स्टाफ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उंडाडे गुरूजी यांनी केले.तर अध्यक्षीय समारोप जडे मैडम यांनी केले.