दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवि दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मागील एक आठवड्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके देखील मंदावले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या वैयक्तिक सल्लागारानं दिलेल्या माहितीनुसार , डॉक्टरांकडून राजू यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आहे. आजतकनं याबाबत वृत्त दिलं आहे.
राजू यांची त्यांच्या प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना त्वरित दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मात्र रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांनी उपचारांचा हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही.
राजू श्रीवास्तव त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीच्या एम्स रुग्णलयात दाखल झालं आहे. यापूर्वी त्यांच्या हृदयाची दोन वेळा सर्जरी करण्यात आली आहेत. त्यानंतर अचानक व्यायाम करत असताना ते खाली कोसळले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून आणि डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही.