
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : अहमदाबाद संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल्सने ५ हजार ६२५ कोटीत खरेदी केली. लखनौ संघ आरपीएसजीने ७,०९० कोटीत खरेदी केला आहे. सीव्हीसी ग्रुपने विदेशात बेटिंग कंपनीत पैसे गुंतवले असल्याचे पुढे येताच सीव्हीसी ग्रुपची अहमदाबाद संघावरची मालकी धोक्यात आली.
आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात पहिला आक्षेप नोंदविला होता. यानंतर मीडिया वृत्तात बेटिंगसंबंधी व्यवहार उघड झाल्याने सीव्हीसीच्या अडचणी
बोली प्रक्रिया पूर्ण होताच सीव्हीसी ग्रुपच्या विशिष्ट व्यवहारांवर आक्षेप घेतला जात आहे.
दिवाळीनंतर बीसीसीआयच्या कायदेशीर पॅनलकडून ही सत्यता पडताळली जाईल. त्यानंतर कंपनीचे व्यवहार आक्षेपार्ह वाटल्यास त्यांची लिलाव प्रक्रिया रद्द केली जाऊ शकेल, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सीव्हीसी ग्रुपने लिलाव प्रक्रियेच्या वेळी ही बाब सांगितली नव्हती. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सीव्हीसी ग्रुपची बोली नियमांवर बोट ठेवून नाकारू शकते. असे झाल्यास बोली लावणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीकडे अहमदाबादच्या आयपीएल टीमची मालकी जाऊ शकते. ही दुसरी कंपनी अर्थात अदानी ग्रुप समूह आहे! अदानी ग्रुपने ५ हजार १०० कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ५२५ कोटींनी अदानी ग्रुप हा लिलाव जिंकू शकले नाहीत. मात्र, आता जर सीव्हीसी ग्रुपला बीसीसीआयने नाकारले, तर या संघाची मालकी अदानी ग्रुपकडे जाऊ शकते.