दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
असाच उपक्रम परभणी येथील बाल विद्या मंदीर हायस्कूल मधील हजारो विद्यार्थ्यांनी राबवण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
पर्यावरणपूरक सॅडो मातीपासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्त्यांमध्ये संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या वृक्षांच्या बियांचे मिश्रण केले आहे. मूर्ती विसर्जनानंतर त्याच बियांपासून निर्माण वृक्षांचे रुजवणे व संगोपन करण्याचाही संकल्प या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह, मेहनत जिद्द व चिकाटी या सर्व बाबी उल्लेखनीय अशाच आहेत.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयकर, उपाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर यांनी विद्यार्थ्यांचे मनस्वी कौतुक केले तर आयोजित उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा यासाठी संस्थेच्या मुख्याध्यापिका शामा मुधळवाडकर, उप मुख्याध्यापक अरुण बो-हाडे, पर्यवेक्षक प्रदीप दुबे, कलाध्यापक केशव दगड यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. एकूणच या संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असाच असल्याने वातावरण आनंददायी असेच दिसून आले.