दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परभणी : परभणी लोकसभेचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक चालू वार्ता चे उपसंपादक दत्तात्रय कराळे यांच्या निवासस्थानी आज दुपारी गौरी-गणपतीचे दर्शन घेतले.
श्री गणरायांचे आगमनाचा पाचवा तर श्री ज्येष्ठा गौरींचा आज दुसरा दिवस आहे. खासदार संजय जाधव हे आपले स्नेही व सहकाऱ्यांसमवेत रविवार, दि. ४ सप्टेंबर २२ रोजी दुपारी पत्रकार दत्तात्रय कराळे यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या हस्ते श्रींची पूजा व आरतीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. त्यानंतर खा. संजय जाधव यांचा पत्रकार दत्तात्रय कराळे यांनी शाल व श्रीफळ प्रदान करुन यथोचित सन्मान केला.
या प्रसंगी युवा सेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रदीपराव भालेराव, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, परभणीचे प्रसिद्ध उद्योगपती तथा खा. जाधव यांचे घनिष्ठ सहकारी पंडितराव मोहिते-पाटील, उद्योजक पप्पूशेठ गायकवाड, ॲड. विशाल कराळे, व्यावसायिक श्री. सोळंकी, श्री. धावडे सर, ओमकार कराळे आदींची उपस्थिती होती.
श्री गौरी-गणपती दर्शनाच्या निमित्ताने प्रथमतः दत्तात्रय कराळे यांच्या निवासस्थानी आलेले खा.संजय जाधव यांनी समाधान व्यक्त करुन त्यांनी श्री. कराळे यांचेशी काही राजकीय घडामोडींवरही चर्चा केली.