दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : दोन दिवसाच्या तेजीनंतर शेअर बाजारातील तेजीला मोठा ब्रेक लागला आहे. आज पहिल्या सत्रापासून शेअर बाजार गडगडला आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 224 अंकांची घसरण झाली आहे.
तर निफ्टीमध्ये 66 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.37 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,346 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.37 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,003 अंकांवर स्थिरावला आहे.
शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात मोठी तेजी दिसून आली होती. पण आज पहिल्या सत्रापासूनच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावर झाला आहे. पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये जवळजवळ एक हजार अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी 298 अंकांची मोठी घसरण झाली आहे.