दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर
सहकारसूर्य मुख्यालय, मुख्य शाखा, वजीराबाद व सिडको शाखेचे सहभाग
तुपकरी हदगाव (प्रतिनिधी) – गोदावरी अर्बन परिवाराच्या वतीने पाच राज्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडच्या सहकारसूर्य मुख्यालयासह, मुख्य शाखा, वजीराबाद व सिडको शाखेतील कर्मचाऱ्यांसह समाजाच्या सर्वस्तरातून महारक्दतान शिबिरास उत्सफूर्त असा प्रतिसाद मिळाला.
या शिबिरास गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी आँनलाईनच्या माध्यमातून शिबिरास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सिडको शाखेचे पालक संचालक साहेबराव मामिलवाड, प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, सहाय्यक व्यवस्थापक प्रशांत कदम, गोपाळ जाधव, चंद्रशेखर शिंदे, पवन यादव, भूषण अयाचित, कल्याणी जहागीरदार, एकनाथ विभुते, गजानन सुर्यवंशी, मुख्यशाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे, वजीराबाद शाखेचे ब्रँच मॅनेजर गुरुतेससिंघ चिरागीया, अधिकारी समृद्धी देसले, शाखाधिकारी पंकज इंदुरकर, अधिकारी सोमेश संगेवार यांची उपस्थिती होती.
गोदावरी अर्बनच्या वतीने मागील नऊ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमासह रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. परंतू गोदावरीच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतुन यंदा महाराष्ट्रासह कर्नाटक, आँध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या पाचही राज्यातील ९१ शाखांमध्ये व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महेश केंद्रे यांच्या नियोजनात ऐतिहासिक असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या महारक्तदान शिबिरास गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेतील कर्मचारी, यांच्यासह अनेकजणांनी रक्तदान शिबिरात मोठ्या उत्साहाने सहभागी होत रक्तदान करुन सामाजिक कर्तव्य पार पाडले. रक्तदान केलेल्या दात्यांना ग्लुकोज, बिस्कीट, केळी देण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास भेट दिलेले डाँ. जितेंद्र हुंडीवाला म्हणाले की, रक्ताच्या कमतरतेमुळे जगभरात अनेकांना जीव गमवावा लागतो. रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी गोदावरी अर्बनने कौतुकास्पद असे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान करताना मनात कुठलीही भिती बाळगण्याची गरज नाही. रक्तातील पेशा वाढवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एक वेळेस रक्तदानन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्य शाखेत सुरु असलेल्या रक्दान शिबिरास शिवसेनेचे उपनेते तथा खासदार हेमंत पाटील यांनी यांनी अच्यानक भेट देऊन रक्दात्यांचे अभिनंदन केले. व गोदावरी परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
——–