दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे गुरुग्राममधील रुग्णालयांत उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वांस घेतला. ते ८२ वर्षाचे होते गुरुग्राममधील मेंदाता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.कोण होते मुलायम सिंह यादव? भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव ८२ वर्षाचे होते त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. मूतीदेवी आणि सुधीर सिंह यादव यांचे पुत्र असलेले मुलायम सिंह यादव मूळचे उत्तर प्रदेशांतील इटावा जिल्ह्यांतील सैफई गावचे ते रहिवासी होते. बीए,बीटी आणि एम.ए. केलेल्या मुलायम सिंह यांनी राजकारणात उत्तंग भरारी घेतली. शिक्षकी पेशा सोडून राजकारणांत प्रवेश करणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजकारणांत सुरुवात केली. मुलायम सिंह यादव यांनी पुढे महत्वांची पदे भूषवली. मुलायम सिंह यादव यांच्या काळात यादव कुटुंबातील सदस्यांना महत्त्वाची पदे मिळाली राजकारण, व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत यादव कुटुंबांने चांगलीच प्रगती केली होती.मुलायम सिंह यादव १९८९ ते १९९१,१९९३ ते १९९५ आणि २००३ते २००७ या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते १९७४ ते २००७ या काळात सात वेळा उत्तरप्रदेश विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सध्या मुलायम सिंह यादव हे सहा वेळा लोकसभा खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९९६ ते १९८२ या काळात देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी आपल्या चांगलाच नावाचा ठसा उमटविला होता. मुलायम सिंह यादव यांच्या जाण्यामुळे राजकीय वर्तुळात दुःखांची पोकळी निर्माण झाली. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.