
*माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या दिपावली निमीत्य स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती*
दैनिक चालू वार्ता
हदगाव प्रतिनिधी
सचिन मुगटकर
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मानवाडी अंबाळा येथील फार्म हाऊस येथे दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता फार मोठा अवाढव्य स्नेह भोजनाचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महीला. मुलीं सहित लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शविली मा. माजी आमदार नागेश पाटील आष्टी कर व समस्त शिवसैनिकांनी येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या गळ्यात भगवा रुमाल घालून स्वागत केले. दोन्ही तालुक्यातील शिवसैनिक तसेच सर्व पक्षातील कार्यकर्ते , पत्रकार बांधव , व्यापारी , कर्मचारी व इतर विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते