दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड- दि.५ अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ अखिल भारतीय छावा संघटना जनसंपर्क कार्यालय मुखेड येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने साहेबांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जेष्ठ नेते मा. श्री. सदाशिवराव पाटील जाधव, राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले, अ. भा. छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष सूर्याजी पाटील शिंदे, अ. भा. छावा युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे, प्रहारचे तालुकाध्यक्ष सतीश पाटील शिंदे, बालाजी पाटील जाहुरकर, बालाजी पाटील शिंदे, बालाजी पाटील इंगोले, मगदूम पठाण, विठ्ठल पाटील आखरगे आदी उपस्थित होते.