दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर :. प्र. चंद्रकांत गज्जलवार वळगकर :-
देगलूर तालुक्यातील वळग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वेदांत गजानन गज्जलवार हा नुकताच झालेल्या इस्रो श्रीहरीकोटा विद्यार्थी सहल निवडीच्या तालुका स्तरीय परीक्षेत यश संपादन करीत पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. आठव्या वर्गात शिकत असलेला हा विद्यार्थी देगलूर तालुकास्तरीय इस्रो श्रीहरीकोटा अंतरिक्ष परीक्षेत यश संपादन करीत 10 मार्च रोजी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये पात्र ठरला आहे. त्यामुळे त्याची शाळेच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापक देशमुख सर यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, शिक्षक वृंद वट्टमवार सर,अग्रेसर, मुंगळे सर, भंगे सर, मनोज पाटील, राठोड सर, गावातील ज्येष्ठ नागरिक रमेश महाराज, शिक्षण समिती सदस्य गज्जलवारसर, पत्रकार गज्जलवार चंद्रकांत ,विद्यार्थी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.