दैनिक चालु वार्ता सर्कल प्रतीनिधी – संतोष भसमपूरे
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले काम नवनियुक्त सरपंच श्रीमती सुमन मिरगे यांनी केले पूर्ण
सविस्तर वृत्त असे की मौजे धसवाडी येथील बौद्ध मंदिर तसेच मातंग समाज मंदिर येथील नाली बेड बांधकाम हे नागरिकांच्या आणि गावातील स्वच्छतेच्या दृष्टीने तसेच वाहनांच्या सोयीसाठी अतिशय महत्वाचे होते .वारंवार मागणी करून त्या कामांना मंजुरी देण्यात कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत होते .बौद्ध मंदिराशेजारी असलेला भाग तर गावातील गटाराचे सांडपाण्यामुळे अतिशय अस्वच्छ होता .या बाबींचा पाठपुरावा गावातील नागरिकांनी नवनियुक्त सरपंच श्रीमती सुमन मिरगे आणि उपसरपंच लखन भैया घोडके यांच्याकडे केला असता तात्काळ कामांना सुरुवात करून गावातील खूप मोठी समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केले आहे.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिकता देणारे सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार गावातील नागरिकांनी मानले .