दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णू मोहन पोले.
लातुर/अहमदपूर: महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा मुख्य नेते शिवसेना(बाळासाहेबांची)यांच्या आदेशावरून श्री मेघराज गंगथडे यांची ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ माने,संपर्कप्रमुख ऍड श्रीनिवास क्षीरसागर साहेब,जिल्हासंघटक ऍड गुलाब अण्णा पटवारी आणी तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये यांच्या हस्ते निवडपत्र देऊन तालुका संघटक पदी निवड करण्यात आली त्या प्रसंगी शहरप्रमुख लक्ष्मणभाऊ अलगुले इतर पदाधिकारी आणी शिवसैनिक उपस्तिथ होते.आपले मनोगत व्यक्त करताना मेघराज गंगथडे म्हणाले की माझ्यावर पक्षनेतृत्वांनी जो विश्वास दाखवलाय तो आपल्या संघटनवाढीच्या कार्यातून मी तो सार्थ करण्याचा प्रयत्न करेल.वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वदाने आणी धर्मवीर आनंद दिघे साहबेंच्या शिकवणीतून मी बाळासाहेबंच्या हिन्दुत्वाचा विचार याचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी कटिबध राहील .ऐंशी टक्के समाजकारण आणी विस टक्के राजकारण हे ब्रीद समजून मी आपल्या पक्ष संघटन वाढी बरोबरच समाज कारणाच्या माध्यमातून समाजिक कार्य करेल.या निवडी बद्दल गंगथडे यांना जिल्हा आणी तालुक्यातील पदाधिकारी ,सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.