दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.26 चंदननगर खराडी येथील सुरेंद्र दादा पठारे फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत फाउंडेशन तर्फे श्री संत तुकाराम शिक्षण संस्था संचलित जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोल्हाई, संत तुकाराम माध्यमिक विद्यालय चंदननगर व कै ग. गो. थिटे प्राथमिक विद्यालय खराडी यांना सांस्कृतिक साहित्य भेट देण्यात आले.
यामध्ये प्रत्येकी एक ढोल, दोन तासे, व प्रत्येकी पन्नास लेझीम सेट देण्यात आले. यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा व खेळाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी वडगाव शेरी मतदार संघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे, सुरेंद्र दादा फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे, नवनाथ पठारे, संस्थेचे सह सचिव अँड काळे, रवींद्र पठारे, मा नगरसेविका सुमन पठारे, नगरसेविका संजीला पठारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे साहित्य मिळाल्याबद्दल प्राचार्य धुमाळ एस एन, ढेरंगे के. एस,व गावडे एन एन यांनी सुरेंद्रदादा फाउंडेशनचे आभार मानले. अशी माहिती प्राध्यापक फलके यांनी दिली.