दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा दवणे..
मंठा तालुक्यातील माळेगाव येथे जागतिक बंजारा दिन आणि हनुमान जयंतीनिमित्त तीन दिवसीय श्री गीता रामायण सत्संग ज्ञानयज्ञ दिनांक : ०६ ते ०८ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.सकाळी १० ते दुपारी 02 पू. राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य
श्री आनंद चैतन्य महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून कथा वाचन होईल नंतर महाप्रसाद सत्संगातील दैनंदिन कार्क्रम
शोभा यात्रा – दिनांक ०६ एप्रिल २०२३, सकाळी ९ वा.
भजनसंध्या व दिपोत्सव:- दिनांक ०६ आणि ०७ एप्रिल २०२३, सायं. ८ वा. नगर संकिर्तन यात्रा रोज सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत होईल.
तरी आपणास नम्र विनंती आहे की श्री आनंद चैतन्यजी महाराज यांच्या अमृतवाणीत प.पू बापूजींच्या विचारांचा
लाभ घेऊन आपले जीवन धन्य बनवा असे आवहान युवा नेते इंजि. माधव गुलाबराव चव्हाण व
आयोजक अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती संपूर्ण परिसर माळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.