
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : मुस्लिम धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचे औचित्य साधून सर्व धर्मातील नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा आणि एकात्मता वाढून सर्वधर्मसमभावाची भावना निर्माण व्हावी तसेच परस्परांमध्ये बंधुभाव, स्नेहभाव वाढावा यासाठी पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर येथील तय्यबा मस्जिद तर्फे इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे,पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे,गजानन खंडाळे, माजी नगरसेवक पिंटूभाऊ धाडवे,माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,माजी नगसेविका शशिकला कुंभार, उद्योजक शाकील भाई पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सामाजिक कार्यकर्ते बाबुराव घाडगे ,दत्ताभाऊ कांबळे,सचिन जोगदंड, संजय वाघमारे, शाहिदभाई पानसरे, गौरव घुले, राजू नदाफ, आनंद साळुंखे, राजेंद्र बर्गे, तसेच पद्मावती वृत्तपत्र विभागातील महादेव कांबळे,सोमनाथ शिर्के,सतीश गायकवाड,नवाब मुल्ला आदी मान्यवर सहभागी झाले होते.
इफ्तार पार्टीचे नियोजन यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर बांगी मित्र परिवार दादाभाई सिंदगी, नूर टपाल, फारूक नासी, इसाक मुल्ला, सुरज खुटवड, फारूक पठाण, आरिफ मुजावर, मोहसीन बागवान, बाबा शेख, फिरोज बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले.