दैनिक चालू वार्ता सिडको प्रतिनिधी -विक्रम खांडेकर
आज शारदा बालक मंदिर मध्ये एक मे निमित्त्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच मुलांना त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी अध्यक्ष विक्रम खांडेकर ,सचिव विश्वास खांडेकर व समन्वयक सोमेश कोकडवार सर हजर होते. कोकडवार सरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व लहान मुलांना त्यांचा वार्षिक निकाल देण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला.