दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
खरीपपूर्व तयारी बैठकीला बसू न दिल्यानं पत्रकारांनी केला पालकमंत्री अतुल सावे यांचा जाहीर निषेध
जोरदार घोषणा देत केला जाहीर निषेध..पत्रकारांनी सावे यांच्या प्रतिक्रिया घेण्यास दिला नाकार….
जालना | प्रतिनिधी- जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगामाच्या तयारी संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडली.या बैठकीसाठी आलेल्या पत्रकारांना वार्तांकनासाठी बैठकीत बसू न दिल्यानं पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा जाहीर निषेध नोंदवला. यानंतर सावे यांनी पत्रकारांशी बोलण्याचा प्रयन्त केला मात्र पत्रकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास नाकार दिल्याने सावे यांना आल्या पावली त्यांना न बोलता काढता पाय घ्यावा लागला…