दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : मुलीच्या खून प्रकरणात आरोपीला पोलीस अटक करत नसल्याने फिर्यादीचा अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सेवली पोलीस ठाण्यासमोर सदर घटना घडली आहे. मात्र पोलिसांकडून सदरील घटना दाबण्याचा प्रयन्त केला जात आहे.
जालना तालुक्यातील शंभु महादेव गावात पंधरा दिवसांपूर्वी एका विहीरीत तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना २६ एप्रिलला घडली होती. या प्रकरणी मयत मुलीचे वडील मच्छिंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंधरा दिवस उलटूनही आरोपींना अटक केली नसल्यामुळे जाधव यांनी रविवारी (७ मे) दुपारी पोलिस ठाण्यासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जणक घटना घडली.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना उजेडात
सदर प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात शुटींग घेतल्याने हा प्रकार समोर आला आहे. परंतु पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी फिर्यादी यांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला आहे. दरम्यान ही घटना सेवली पोलिसांनी दाबन्याचा प्रयन्त केल्याचा आरोपही केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे