दैनिक चालू वार्ता उपसंपादक मराठवाडा-ओंकार लव्हेकर
नांदेड –
नांदेड येथे अल्पावधी मध्ये नांदेड शहरात भरपूर प्रमाणात नाव कमविलेले ‘स्वर गंध संगीत ‘मंचने आपल्या जोरदार कार्यक्रमांनी रसिकांना गाण्यांची मेजवानी दिली आहे. सदरील संगीत मंच चा कार्यक्रम ख्यातनाम संगीतकार एस .पी. बालसुब्रमण्यम यांच्या जन्मदिवस निमित्ताने हॉटेल विसावा पॅलेस येथे साजरा करण्यात आला.
एस. पी .बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या गीता बरोबरच इतर गीतेही कलावंतांनी सादर करून रसिकांची मने जिंकली .मार्गदर्शक सुनील गुरु यांच्या अधिकाधिक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी ठरला .
प्रामुख्याने साईनाथ लिंगाडे सुरजीतसिंघ पुजारी, सुनील गुरु, रामदास प्रभू, युगंधरा सांगविकर, प्रणोती बिलोलीकर मीना सोलापुरे यांनी एकापेक्षा एक बहारदार गीतांचे सादरीकरण करून प्रेक्षकांमध्ये आनंद निर्माण केला .तसेच संजय काचावर यांनी निवेदनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पडली कार्यक्रमास भरपूर प्रमाणात रसिक उपस्थित होते.