दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील जुन्या लोहयातील नवी आबादी येथील लोबकळलेले विद्युत तार महावितरणने तात्काळ काढावे अशी मागणी आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर यांनी लोहा येथील म.रा. वि. महावितरणच्या अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद की, जुना लोहा नवी आबादी येथील मुख्य रस्त्यालगत विद्युत तार खाली झुकले असुन ते तार गल्ली मध्ये छोट्या मोठ्या वाहनांना लागत असुन ते हालत आहेत त्यामुळे या रस्त्यावरुन ये -जा करणाऱ्या नागरिकांना भिती वाटत असुन हे विद्युत तार तुटून खाली पडला तर जीवीतहाणी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना व वयोवृध्दाना रस्त्याच्या बाजूने रस्ता भिती निर्माण होऊन रस्ता शोधत चालावे लागत आहे.
तेव्हा याकडे महावितरणच्या अभियंत्यांने तात्काळ लक्ष देऊन सदरील लोबकळलेले विद्युत तारा तात्काळ काढाव्यात अशी मागणी आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर यांनी महावितरणच्या अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रूद्रा पा भोस्कर, प्रसाद पोले प्रसाद कहाळेकर, बाळु सोनटक्के सह आदिंची उपस्थिती होती.