जालना प्रतिनिधी आकाश माने
71 हजारा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
जालन्यात ‘नायट्रासेन’ या नशेच्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी काल विधानसभेत नशेच्या गोळ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आणि सापळा रचुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.शेख सोहेल शेख शकील आणि कलदरसिंग टाक अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.त्यांच्या ताब्यातून 15 पाकिटे गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
नवीन जालना भागातील दोन तरुण नायट्रासेन या बेकायदेशीर रित्या गोळ्या आणून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकता येत नसतांनाही हे दोन तरुण एमआरपीपेक्षा जास्त दराने विकत असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईनंतर आमदार कैलास गोरंटयाल यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.
जालना शहरात नशेकरीता वापरण्यात येणाऱ्या बटण गोळी विक्री करणारे इसमांविरुध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन अशाप्रकारचे इसमांची माहिती घेत असतांना दिनांक 20/07/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदार यांचेकडुन बातमी मिळाली की, जालना शहरात मानवी आरोग्यास अपायकारक असलेले गुंगीकारक व नशेसाठी गैरवापर होणारे बटन गोळयांची विक्री करण्यासाठी दोन इसम मोटारसायकलने संजीरी पान सेंटर कडुन पोष्ट ऑफिस कडे जाणारे रस्त्याने जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
स्था.गु.शा. चे अधिकारी व अंमलदार तसेच मा. सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग जालना येथील अधिकारी यांनी संजीरी पान सेंटर जालना जवळ सापळा रचुन एका विना क्रमांकाचे स्प्लेंडर मोटारसायकलवर बसुन आलेले इसम नामे 1)शेख सोहेल शेख अकील वय 22 वर्षे, रा. मोदीखाना जालना, (2) कलदारसिंग निक्कासिंग टाक वय 52 वर्षे, रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना असे दोघांना त्यांचेकडील मानवी जिवीतास अपायकारक तसेच नशेकरीता गैरवापर करण्यात येणारे Nitrazepam हा प्रतिबंधीत घटक असलेल्या Nitrusun 10 या गोळया (बटण गोळया) सह ताब्यात
घेण्यात आले आहे. नमुद आरोपी यांचे ताब्यातुन एकुण 155 गोळया व इतर असा एकुण 71,002/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपींविरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे कलम 328276 भादंवि सह कलम 8 (C), 22 (a) NDPS Act सह कलम 18 (a)18 (c ) 27 (b) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि प्रमोद बोंडले, श्रीमती वर्षा महाजन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग जालना व पोलीस अमंलदार कांबळे, पोहेकॉ गोकुळसिंग कायटे, पोहेकॉ विनोद गडधे, पोहेकॉ / कृष्णा तंगे, पोहेकॉ/रुस्तुम जैवाळ, पोहेकॉ/लक्ष्मीकांत आडेप, पोहेकॉ/विजय डिक्कर, पोहेकॉ /सचिन चौधरी, पोहेकॉ / प्रशांत लोखंडे, पोका /योगेश सहाणे, पोकों/ कैलास चेके, पोकों/धिरज भोसले, चालक पोहेकॉ , रमेश पैठणे सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.