दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती :शहरातील माता खडकी चौक येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वीरशैव कंकय्या चर्मकार समाज संस्थेद्वारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती महोत्सवावेळी मोठ्या संख्येने वीरशैव कंकय्या चर्मकार समाज विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी वीरशैव कंकय्या चर्मकार समाज विकास संस्थेचे अमरावती जिल्हा संघटक सचिन वाटकर,अरुण चव्हाण युवा कार्यकर्ते अरविंद सावरकर,प्रदीप पिढेकर,गणेश मेशकर,अजिंक्य सावरकर,रवींद्र उज्जैनकर,अनिल सावरकर,हनुमंता विजयकर,विनोद कोठेकर,नारायण चव्हाण,शेखर गायकवाड,धीरज अर्जापुरे,बाला रावेकर,सुभाष हिवराळे आदी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.