दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर; दिनांक १ ऑगस्ट 2023 रोजी देगलूर येथील अण्णा भाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी करण्यात आली त्यावेळी देगलूर शहरांतील विविध राजकीय पक्षाचे नेत्यांनी अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील देगलूर उदगीर रोडवरील साठे चौकात अण्णा भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अनेक मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.अंकुश देसाई देगावकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख बळेगावकर, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक गंदपवार, अशोक कांबळे, दिगंबर कौरवार, कृष्णा जोशी, बालाजी थडके, जनार्दन बिरादार, सरपंच माधव वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.