दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील पाकणी येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे समाजसेवक म्हणुन सुपरिचित असणारे उमदे युवा नेतृत्व म्हणुन तालुक्यात ओळख असलेले श्री.संतोष खारवणे यांना दिपस्तंभ वक्तृत्व विकास पुणे यांच्या वतीने दि.३० जुलै रोजी “गौरव वक्तृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा” हा पुरस्कार व सन्मानपत्र दिपस्तंभ वक्तृत्व विकास चे अध्यक्ष श्री.रविंद्र पवार सर यांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर सामाजिक,राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रात आपण आपल्या कर्तृत्वाची जोड देऊन उल्लेखनीय योगदान दिले आपल्या या कर्तृत्वाचा आम्हास सार्थ अभिमान आहे.असेही या मानपत्रामध्ये म्हटले आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे श्री.संतोष खारवणे यांचे गावातील नागरिक,नातेवाईक व मिञ परिवार अनेकांनी अभिनंदन केले.व पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.