दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि . 07 ऑगस्ट (भोसरी )
भोसरी येथील एम.आय.डी.सी मध्ये एस ब्लॉक प्लॉट नंबर एस 100 मधील चौकामध्ये महावितरण डिस्ट्रीब्यूशन बॉक्स बसवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. महावितरण हे काम एका खाजगी व्यवसायिकाला दिले आहे. परंतु खाजगी व्यावसायिक कामगारांना सुरक्षित साधने पुरवतात की नाही हे बघण्याचे जबाबदारी ही महावितरणच्या अधिकाऱ्यांची पण आहे . आणि सुरक्षित साधने पुरवणे हे काम खाजगी व्यवसायिकाची पण तितकीच जबाबदारी आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपला जीव धोक्यात घालून पोटासाठी काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा बघणे ही जबाबदारी अखेर कुणाची? असा संतप्त सवाल प्रत्यक्ष दर्शनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड व पंडित वनसकर यांनी केला आहे.