दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर); नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व कै. नळगे विद्यालय लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा येथे शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण१४ संघानी भाग घेतला. त्यात १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात सप्तगिरी पोदार लर्न स्कूलच्या संघाने द्वितीय स्थान पटकाविले व तसेच १७ वर्षांखालील मुलीच्या संघाने सुद्धा द्वितीय स्थान पटकाविले.
मिळालेल्या यशाबद्दल शाळेच्या सर्व संचालकांनी व शाळेचे प्रिंसिपल श्री सचिन कोल्हे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूचे कौतुक व अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजयी संघाना शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश दिलीप येनवळ व शैलेंद्र दशरथ कुकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुलांच्या विजयी संघात महेश काळे, संकल्प राठोड, अखिलेश चप्पलवार, पृथ्वीराज चव्हाण,अमेय पोलावार, प्रीतम बोडके, शेख मंशद, सोहम पाटील, धीरज पवार, पृथ्वीराज स्वन्तकर, ओम साई लोलपे, नरेश गुज्जरवार, अर्जुन भांगे, प्रणव सोनटक्के, रुद्राक्ष मानसपुरे यांचा समावेश होता.
मुलींच्या विजयी संघात शेख माहीन, तनुश्री पाटील, त्रिशा पंदिलवार, स्नेहा राजुरे, स्नेहा गुज्जरवार, शरयू लगडे, श्रणया येरावार, शरयू देशमुख, अपूर्वा चेवले, किर्ती इलतेपवार यांचा समावेश होता.