दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर): बिंदू नामावलीच्या अद्यावत करण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळेचे सप्टेंबर २०२३ चे वेतन थांबविणे हे अन्यायकारक आहे. संबंधित शाळांचे वेतन काढण्याचे आदेश निर्गमित करण्यासंदर्भात शिक्षक नेते तथा महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी जि.प. नांदेड यांना निवेदन दिले.
एखाद्या संस्थेने बिंदू नामावली नाही केल्यास त्यांचे वितनेत्तर अनुदान रोखण्यात येते सदर बाब शिक्षण अधिकारी कार्यालयास कल्पना असूनही ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन थांबविणे योग्य नसल्यामुळे सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक अनुदानित विनानित शाळेची बिंदू नामावली अध्ययन केल्यास माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन स्थगित करण्याचे आदेश आपल्या कार्यालयाला काढलेले कितपत योग्य आहे.
तसेच अतिरिक्त शिक्षकांचे कायम समायोजन करण्याकरता अनेक वेळा कॅम्प ही आयोजित केले तरीही शिक्षण विभागाकडून कधीही बिंदू नामावली रोस्टर प्रमाणे कायम समायोजन केले नाही. बिंदू नामावली च्या नावाखाली शिक्षकांचे सप्टेंबर २०२३ चे वेतन सणासुदीच्या दिवसात न काढल्यास शिक्षकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन स्थगित न ठेवता सदरील चुकीचे आदेश रद्द करून वेतन काढण्यासंदर्भात पत्र काढावे जेणेकरून शिक्षकांना ऐन सणासुदीच्या दिवसात उपासमारीची वेळ येणार नाही. वेतन काढण्याचे आदेश निर्गमित करावेत. तसे न केल्यास महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला.