दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : संस्कृतीचा अनमोल ठेवा जपण्यासाठी श्रावण मासनिमित्त शिरूर तालुका मित्र परिवार पुणे, आम्हीं सावित्रीच्या लेकी, आपलं खराडी चंदननगर, गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नऊवारी साडी, साजशृंगार, हातावर खुललेली मेंदी, केसात माळलेला गजरा, अशा थाटात पिंगा गं पोरी पिंगा, नाच ग घुमा, कशी मी नाचू?
या तालावर असंख्य महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये मंगळागौर,उखाणे,वेशभुषा,गायन, कविता, लकी ड्रॉ अशा असंख्य स्पर्धांमधून महिला भगिनींनी खुप धमाल,मस्ती,करून आनंद लुटला या सपर्धेत प्रथम क्र- नादब्रह्म ग्रुप,द्वितीय क्र- हिरकणी ग्रुप, तृतीय क्र – प्रतिकार ग्रुप यांनी पटकवला.तसेच वैयक्तिक असंख्य बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन सौ.तेजश्री बाळा पऱ्हाड, शैला खेडकर,
सुरेखा पऱ्हाड, अश्विनी खेडकर, वंदना डफळ, सुजाता नरवडे,सुरेखाताई शेंडे,कमल थिटे,योगिता साकोरे,सौ.यादव,सौ. सुनीता वेताळ, सुनीता येळे यांनी केले होते.परीक्षक म्हणून सौ.हर्षाली कोलते यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सौ.संगीता सदावर्ते, मुकेश इंगवले यांनी केले. या वेळी कार्यक्रमाच्या आयोजक सौ तेजश्री ताई पऱ्हाड यांनी संबोधित करताना सांगितले
की घरातील गृहिणीपदाची जबाबदारी सांभाळून नोकरी व व्यवसाय प्रामाणिकपणे करत असताना महिला आपल्या छंदातून हिंदु संस्कृतीची ओळख असलेल्या आणि नुकत्याच ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने नव्यानं प्रसिद्ध झालेल्या मंगळागौर या कार्यक्रमातून जपणूक केली आहे. या महिला आदिशक्तीच्या विविध रूपात जागर करत असतात .