दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (वरुड) : वरुड महामार्गावर दोन गाड्यांच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत नऊ जण जखमी झाले असून,त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.ही घटना रविवारी (दि.१७) रोजी दुपारी साडेचार वाजता मोर्शीपासून ७ किमी.अंतरावरील दापोरी येथे घडली आहे.
घटनेच्या वेळी क्रुझर गाडी क्रमांक एम.एच २० बी.ए ४६५६ संत्रा तोडीचे मजूर घेऊन जात असतांना समोरून येणाऱ्या एका वाहनाने एम.एच क्र.४८ एफ ४५७८ धडक दिली.त्यामध्ये पीयूष काळे,सुभाष शुक्ला,बस्तीराम उईके,रामदेव उईके,मंगेश उईके,नीलेश कडू,राजू धुर्वे,हंसलाल धुर्वे,सुभाष यादव हे नऊ जण गंभीर जखमी झाले.त्यापैकी तिघांना गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
दोन्ही वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास मोर्शी पोलीस करत आहेत.या अपघातामुळे काही काळाकरिता रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.