पुणे प्रतिनिधी
पुणे : दिनांक – १/१०/२०२१ रोजी मा. शाखा व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,पुणे महानगरपालिका शाखा,पुणे व मा.पोलिस निरीक्षक,शिवाजी नगर,पोलिस स्टेशन येथे बँक ऑफ महाराष्ट्र,पुणे महानगरपालिकेतील लावलेला बोर्ड हा हिंदी मजकुरात लावला गेला असल्या कारणाने ते मराठीत असावा असे त्यांना एक निवेदन दिले होते तरी सुद्धा आज रोजी पर्यंत सदर बोर्ड काढला नाही व त्या निवेदनात असे म्हटले होते की बोर्ड जर मराठीत नाही केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल. महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठीचा वारसा चालवणाय्रा सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..मराठी मातृभाषा असणाय्रा लोकांच्या संख्येनूसार मराठी ही जगातील १० वी तर भारतातील ३ री भाषा आहे. आपल्या मातृभाषेच प्रभूत्व येवढं भक्कम असताना देखील आपल्यातलीच काही मनानी उपरी झालेली लोकं आपली मातृभाषा फक्त बोलनतानाच नाही तर नाकारतानासुद्धा दिसतात. आपली भाषा ही आपली दुसरी जननी असे मी मानतो व अश्या आपल्या भाषेचा अवमान झालेला मला तरी चालणार नाही. वेस्टर्निसमचा नादात आपली पोरं चूकीच्या मार्गालाच नव्हे तर येवढ्या खालच्या थराला जाऊन पोहचतील असं वाटलं नव्हतं. यासाठीच का केला होता १९६० चा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अट्टहास. वेस्टर्निसमला माझा विरोध नाही पण त्यामुळेच आपल्यातले काही बिंडोक लोक आपली संस्कृती व आपला वारसा विसरतात हे काही योग्य नाही. आपली भाषा जपनं ही आपली जबाबदारीच आहे विसरु नका आपल्या भाषेवरुणच आपली खरी ओळख असते आणि अशा भाषेचे उच्चार माझा मुखातून रोज होतात याचा मला सार्थ अभिमान आहे. बघा पटलं तर वेळीच सावध व्हा व चला पुन्हा एकदा अखंड मराठी भाषिकांचा महाराष्ट्र घडवूयात
पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे या पुण्यामध्ये पुणे महानगरपालिके मध्ये मराठी भाषा जर पोरकी होत असेल तर त्याचा उपयोग काय ???
द्वेष नाही हिंदीचा अभिमान आहे मराठीचा !!!
अशा प्रकारचे फलक दाखवून पुणे महानगरपालिकेच्या पोर्च मध्ये श्री.निलेश प्रकाश व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून आज आंदोलन करण्यात आले यावेळी कुणाल हेंद्रे , सुभाष माने , अनिल पवार ,रंजीत माने, गणेश शिंदे, कृष्णा जाधव , अक्षय पवार,अजय झडपे, विकी कुसाळकर , गणेश जोशी, साहिल कंट्रोल ,संदेश जोशी, दीपक तुसम व अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
श्री.निलेश प्रकाश निकम.
महाराष्ट्र सैनिक