दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू!!!
पंढरपूर: स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आज अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून बालाजीनगर, मंगळवेढा येथील ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य प्रा. सुनिल नष्टे सर उपस्थित होते. यावेळी स्वेरी अभियांत्रिकी मधील प्रा.डॉ.एन. डी.मिसाळ, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासंदर्भात कांही शंका/ अडचणी असतील तर विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन सुविधेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क: ८९२९१००६१३