
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
जागतिक वसुंधरा दिन व जागतिक नृत्यदिनानिमित्त पुणे भाजप महिला आयटी प्रकोष्ठ,पद्मकोष कथक नृत्यसंस्था, शास्त्रीय नृत्य संवर्धन समिती व 51 A नैसर्गिक संवर्धन संस्थेच्या सहयोगाने वनगामीनी कथक नृत्यातून निसर्ग संवर्धनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना पद्मकोष संस्थेच्या संचालक सोनल पेंडसे यांची होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्रीताई खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नृत्य ही आनंदाची अभिव्यक्ती आहे. नृत्य म्हणजे मानवी जीवनातच नव्हे, तर विश्वात आढळणाऱ्या सर्वसाधारण लयीच्या आवाहनास व्यक्तिविशिष्ट अशी होणारी मानवी प्रतिक्रिया आहे. निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि नृत्य याची सांगड घालणे ही अत्यंत सुंदर संकल्पना आहे, असे मुरलीधरजी मोहोळ म्हणाले. मंजुश्रीताईंनी आपल्या भाषणात सांगितले की आदिम काळापासून मानवी भावनांचा आविष्कार नृत्यातून व्यक्त होत आला आहे. निसर्गाबद्दल प्रेम आणि त्याची निगा राखण्याचा नृत्यातून संदेश ही कल्पना वाखाणण्याजोगी आहे असेही त्या म्हणाल्य.
यावेळी नगरसेवक दिपकजी पोटे, जयंतजी भावे, हर्षालीताई माथवड,अल्पनाताई वरपे,वृषालीताई चौधरी, स्वीकृत सदस्या मीतालीताई सावळेकर,भाजप कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यन्तजी मोहोळ, उद्योग आघाडी सरचिटणीस रामदासजी गावडे,भाग्यश्रीताई बोरकर, पल्लवीताई गाडगीळ, सुप्रियाताई माझिरे, केतकीताई कुलकर्णी,जयश्रीताई तलेसरा, जयश्रीताई घाटे, रमाताई डांगे,गौरीताई करंजकर, सुलभाताई जगताप, प्राचीताई बगाटे, निलेशजी गरुडकर, वैभवजी मुरकुटे, विठ्ठलजी मानकर, वर्षाताई पाटील, सायनदेव देहाडराय, 51A चे founder अनय पेठे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाजप आय टी प्रकोष्ठ च्या पुणे शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर यांनी केले, आभार प्रदर्शन जागृतीताई कणेकर यांनी केले.
आपली,
सौ.कल्याणी खर्डेकर.
मो – 9604130518
संयोजिका, आय टी प्रकोष्ठ.
भाजप महिला मोर्चा.पुणे.