
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्या निर्माण होतात, अनेक संकटेही येतात, अनेक वादळे येतात, परंतु हे सगळं येऊन सुद्धा जिवनातील समाधान चिरंतन नसते. त्या अनुषंगाने आत्मशांती खुप महत्त्वपुर्ण आहे. जीवन जगत असताना सुख दुःख समस्या अडचणी निर्माण होण स्वभाविक आहे क्रमप्राप्त आहे परंतु समस्या निर्माण झाल्या सुख दुःख आली तर आपण आध्यत्मिक ज्ञानाने त्यावर नक्कीच मार्ग काढु शकतो आणि जर आपण आध्यत्मिक ज्ञान जाणत असु तर आपण समस्या आणि सुख दुःख याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ देणार नाही.
तसेच योग्य पद्धतीने सर्व समस्या वर मार्ग शोधून सचोटीने प्रामाणिकपणे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार परंतु यश अपयश या अनुषंगाने आपण व्यथित किंवा निराश होणार नाही तसेच आपल्याला जीवनातील जी महत्वपूर्ण बाब आहे ती म्हणजे आत्मशांती, समाधान याच्यावर अध्यात्मिक ज्ञान परिणाम होवू देणार नाही आध्यत्मिक ज्ञान हे अमृत आहे प्रत्येक सुख दुःख समस्या अडचणी या विषयी भगवद्गीता तसेच विविध आध्यत्मिक साहित्य या मध्ये वर्णन आले आहे समस्या दुःख अडचणी याच मुळं आपण आध्यत्मिक पद्धतीने शोधलं तर दुःख शुन्य होत आणि दुःख संपुष्टात आलं तर मन शांत होऊन आत्मशांती जाणवते.
अध्यात्म म्हणजे खर्या अर्थाने आत्मशांतीचा मार्ग आहे अध्यात्म कळलं ज्ञान कळलं की दुःख समस्या अडचणी शुन्य वाटतात आणि एकदा का दुःख समस्या अडचणी शुन्य किरकोळ वाटल्या की आत्मशांती अवस्था निर्माण होते म्हणून आध्यत्मिक दिशेने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. दुःख कोणाच्या जीवनात नाही असा या भूतलावावर कोणता जीवन नाही. पण जीवनात अध्यत्मिक ज्ञान किती अर्जित केले यावर सुख-दुःखाची तीव्रता अवलंबून आहे.संपत्ती किती कमवली तसेच भौतिक सोयी-सुविधा या आपल्या किती उपलब्ध आहेत यावर जिवनातील समाधान, आनंद, शांती ही अवलंबून नाही तर अध्यत्मिक ज्ञान किती अर्जित केले यावर सुख समाधान आनंद शांती अवलंबून आहे.
त्या अनुषंगाने दैनंदिन जीवन व्यथित करीत असतांना आपण सर्व सुख सुविधा मिळवित असतांना जर अध्यात्मिक ज्ञान अवगत केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच स्थिरता, समाधान शांतता नांदेल यात तिळमात्र शंका नाही. दैनंदिन जीवनातील बहुतांशवेळ हा आपण सांसारिक बाबीसाठी खर्च करतो परंतु आपल्या जीवनातील महत्वपुर्ण बाब आत्मशांती जी अध्यात्मातून मिळते त्यासाठी मात्र आपल्याकडे किंचीतही वेळ नसतो ही शोकांतिका आहे. एक जुनी म्हण आहे की सुज्ञान सांगणे न लगे याचा सरळ सरळ अर्थ घेतला तर सुज्ञ म्हणजे ज्ञानी व्यक्तीना काही सांगायची गरज नाही ते आपले स्वतःच्या अडचणी स्वतः कुशल रितीने सोडवितात.
एवढेच काय तर ते भविष्यातील वाट पाहून पुढे चालतात आणि अनेक संकटे वादळासारखी त्यांच्यासमोर आली यत्किंचीत न डगमगता ,घाबरता अगदी धिरोदात्तपणे ते संकटांना सहज सामोरे जातात असे सुज्ञ होण्यासाठी अध्यात्मिक मार्ग हा एकमेव ज्ञान ग्रहन करण्याचा मार्ग आहे. गरीब मजुराला झोप येण्यासाठी फक्त चटई आणि उशीची गरज असते तर अनेक श्रीमंत व्यक्तींना तीच झोप येण्यासाठी गोळी खावून झोप आणावी लागते. तात्पर्य झोप हीसुद्धा गरीब- श्रीमंतीवर अवलंबून नसून ती आत्मशांतीवरच अवलंबून असते आणि आत्मशांती ही फक्त अध्यात्मिक ज्ञानातून मिळते म्हणून अध्यात्मिक ज्ञान हे जगातील सर्वोत्कृष्ट श्रीमंती आहे. ज्याच्याकडे अध्यात्मिक ज्ञान आणि शांत झोप आहे तो सद्यस्थितीत जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीमत्त्व आहे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ,
महाराष्ट्र वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक
बालसंस्कार शिबिर, अध्यात्मिक मार्गदर्शक
मो.9011634301