
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जगातील सगळ्यात कठीण गोष्ट आहे सत्य स्वीकारणं सत्य स्वीकारणं जमलं कि मग असत्य आणि दुःख आपला पिछा आपोआप सोडत परंतु आपल्या मनाने काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं हे आपल्यावर अवलंबून असतं परंतु जे आपल्या कडे वर्तमान परिस्थितीत उपलब्ध आहे त्यामध्ये समाधान आनंद मानने म्हणजे सत्य स्वीकारणं होय इच्छा अनंत आहेत अपेक्षा अनंत आहेत पण वास्तवाचं भान हे सत्य आहे आणि सत्य स्वीकारता आलं पाहिजे व आपल्याकडे जे उपलब्ध साधन आहेत त्या मध्ये समाधान मानण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे .मग कितीही मोठी घटना घडामोड आपल्या वर काहीही परिणाम करू शकत नाही.
अनेकदा आपल्या मनाला काही वेगळं अपेक्षित असतं आणि उपलब्ध वेगळं असतं मग या मध्ये सुद्धा संतुलन निर्माण करुन आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या मनाला स्थिरावता आलं पाहिजे .मनाची समजूत घालता आली पाहिजे सत्य समजवता आलं कि मग मात्र मन दुःख मुक्त होत जीवन हे क्षणभंगुर आहे तरी सुद्धा अपेक्षा इच्छा ह्या अनंत असतात . बहुतांश अपेक्षा पुर्ण होतात तर काही अपेक्षा अपुऱ्या राहतात . आणि जीवनाच्या रंगमंचावर अपेक्षांचा लंपडाव चालू असतो . मग या मधुनच सुख दुःखांची निर्मिती होते . परंतु या सगळ्या मध्ये महत्वाची गोष्ट हि आहे जे उपलब्ध आहे त्या मध्ये समाधान मानण्याची वृत्ती जर निर्माण झाली तर दुःख मुक्त होण्यापासून आपल्यला कोणतीही शक्ती रोखु शकत नाही.कितीही आणि काहीही मिळाल तरी मानवी मन हे असं विचित्र आहे कि ते आपल्याला जे मिळालं त्याबद्दल कधीच समाधानी राहु देत नाही .कारण मानवी मन हे अंत्यत चंचल असतं . आणि ते आपलं हितकारक पण असतं आणि अहितकारक सुद्धा असत .म्हणजे एकंदरीत मानवी मन हे आपल्या सुख दुःखच मुळ असतं त्यामुळे मनाला संभाळन हे आपलं खुप मोठ कौशल्य असत. शेवटी आपल्या सोबत काय काय नाही, आपण काय कमावले काय गमावले हे फार महत्त्वाचे नाही कारण निसर्गाच्या नियमानुसार आपल्यला अखत्यारी मध्ये कुठलिही गोष्ट नाही .मग तरी सुद्धा आपण जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनाक्रम च्या अनुषंगाने दुःख व्यक्त करतोय . हे कितपत योग्य आहे . सगळ्या बाबी आपल्या मनाला महित असताना सुद्धा आपण जे वास्तविक आणि अंतिम सत्य आपल्याला माहित असताना आपल्या मनाला ते आपण समाजु शकत नाहीत हिच बाबा खुप आश्चर्य कारक आहे . सत्य माहित असताना ते मनाला समजवता न येण हेच खुप अवघड आहे . आणि त्यामुळेच सर्वकाही मिळुन सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपण दुःखी होतोच मग त्यासाठी प्रभावी उपाय हाच आहे कि जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्या मध्ये समाधान मानण्याची वृत्ती निर्माण झाली किंवा हि कला ज्यांना अवगत झाली आहे त्यांना कुठल्याही दुःखाची तीव्रता काहीही परिणाम करू शकत नाही . आणि मनाला सत्य समजवण्याचा सामर्थ्य हे फक्त अध्यात्मिक ज्ञाना मध्ये आहे
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301