
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
निसर्गाचे काही संकेत असतात . आणि हे संकेत प्रत्येक मानवी मनाला जाणवतात समजतात . परंतु तयाच पालन करणं किंवा न करणं हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं म्हणजे व्यक्ती आपल्या सोयीनुसार आवश्यकतेनुसार या सिद्धांतावर मात करतो .तर अनेक व्यक्ती असो पण आहेत कि देह गेला तरी चालेल पण ते सृष्टीच्या अलिखित नियमांचे उलंखघन करत नाहीत.वेळ प्रसंगी दुःख भोगातात त्रास सहन करतात पण सृष्टीच्या अलिखित नियमांचे पालन करतातच .तर अनेक लोक क्षणिक दुःख त्रास होऊ नये म्हणून निसर्गाचे अलिखित नियम इच्छा नसतानाही मोडतात .अनेकदा काही गोष्टी करताना मनात संकोच संभ्रम निर्माण होतो .मन खंबीर साथ देत नाही किंवा आपली मानसिक तयारी होत नाही .याचा अर्थ एखादी बाब विषय प्रथम दर्शनी मनाला न पटण किंवा योग्य न वाटण म्हणजे सृष्टीच्या अलिखित नियमांचे उलंखघन . जे कृत्य करण्यासाठी मनात कुठलाही संकोच निर्माण होत नाही प्रथम दर्शनी आपण अगदी आत्मविश्वासाने भरलेले असते कुठलाही संकोच भ्रम प्रथम दर्शनी जाणवत नाही हि कृती म्हणजे निसर्गाशी सुसंगत आणि सृष्टीच्या अलिखित नियमांचे पालन करणारी कृतीच मुख्यत्वे आपलं मन बुद्धी हेच निसर्गाशी सुसंगत, आणि विसंगत कृती करण्याची प्रेरणास्थान तसेच आपलं मन हेच सृष्टीच्या अलिखित नियमांचे पालन आणि उलंखघन करण्याची भुमिका निर्माण करणार शक्ति केंद्र आहे .जीवनाच्या वाटेवर अनेक छोट्या छोट्या गोष्टी बाबी घडत असतात घडामोडी घडत असतात अगदी प्रदीर्घ परिणाम करतील अशा पण घटना घडतात हे सर्व घडताना आपण त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असतो आणि आपला सहभाग हा नोंदविताना आपल्यला आपल्या स्वविवेकावरून सृष्टीच्या अलिखित नियमांचे पालन करता आले तर आपण निसर्गाशी सुसंगत आहोत . म्हणजे या सगळ्यात आपण नैसर्गिक सिद्धांत, न्याय,निति, तत्व धर्म ,हे पायदळी तुडवून प्रवास करत नाही . आपल्या अंतर्मनाला जे योग्य वाटत ते निसर्गाशी सुसंगत असतं . परंतु बाह्य मन हे सगळं मान्य करत नाही हा वेळेचा प्रभाव आहे .जो सध्याच्या युगाशी सुसंगत आहे.आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या परिसरातील सहवासातील , परिचयातील तसेच सृष्टीच्या रचनेतील अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीमात्र किंवा अपरीचित अशा कुठल्याही जीवा सजीवांच्या अधिकारावर कळत किंवा न कळत अतिक्रमण न करणं तसेच आपल्या आचरणातून कोणत्याही सजीवाला खेद दुःख व्यक्त करावं लागेल अशी वेळ येणार नाही याची काळजी दक्षता घेणं . म्हणजे एक सुजनशिल , संवेदनशील, आणि अगदी सहज सर्वसाधारण असं जीवन जगता येण म्हणजे निसर्गाशी सुसंगत अस जीवन जगणं .नैसर्गिक सिद्धांत न्याय तत्वानुसार धर्म शास्त्रानुसार आपल्या अस्तित्वाचा इतर कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी दक्षता घेऊन लिखित तसेच अलिखित नियमांच्या अनुषंगाने सृष्टीच्या सान्निध्यात निसर्गाशी सुसंगत अस जीवन जगणं जर मानव शिकला तर संबंध सृष्टी वर शांतता नांदेल या मध्ये शंका नाही. शांतता हि सृष्टी वरील सगळ्यासाठी खुप आवश्यक बाब आहे . आपण आपलं जीवन जगत असताना आपण अलिखित नियमांच पालन केले तर आपल्या कडुन इतर कुठल्याही सजीवाला अडचण निर्माण होणार नाही किंवा कुणाच्या हि अधिकार क्षेत्रावर गदा येणार नाही .दैनंदिन नित्यक्रमानुसार सृष्टीचे नियोजन चालू असत. निसर्गाच्या सान्निध्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत आणि हे सगळे जीव आपल्या आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात .या सगळ्या जीवा पैकी मानव हा एकमेव सजीव असा आहे कि जो लिखित नियमावली नुसार सुद्धा आचरण करताना अनेक वेळा अनेक गडबडी करतो . मानव सोडता इतरा जीवांना ना कुठल संविधान असतं ना कुठला लिखित नियम असतो तरी सुद्धा ते अगदी सृष्टीच्या अलिखित नियमानुसार निसर्गाशी सुसंगत अस आचरण करत असतात . मग हिच गोष्ट मानवाला का जमत नाही . किंवा मानवासाठी हे सगळं का अवघड आहे वास्तविक पाहता मानव हा उपलब्ध आणि लिखित नियमाला सुद्धा बगल देऊन पळवाट शोधुन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो . म्हणजे एकंदरीत पाहता मानवाला कुठेतरी जीवन जगाताना नैसर्गिक सिद्धांत आणि न्याय तत्वानुसार अलिखित नियामांच पालन करता आलं पाहिजे आणि जर मानवाला अलिखित नियामांच पालन करता आलं तर आज ज्या दिशेने मानवाचा प्रवास चालू आहे या सगळ्या प्रक्रियेला आळा बसुन पुन्हा एकदा मानव हा मानव होईल यामध्ये काहीच शंका नाही .आपल्याला लिखित नियमांचे पालन तर करावेच लागते मग आपल्या मनातुन आपली इच्छा असली काय किंवा इच्छा नसली काय फार फार कही नियमांच पालन करताना आपण विलंब दिरंगाई करू शकतो पण सरतेशेवटी लिखित नियम हे पाळावेच लागतात ते पायदळी तुडवून पुढे जात येत नाही पण जीवनाच्या प्रवाहात निसर्गाचे काही अलिखित नियम असतात आणि हे नियम समजणं जाणणं आणि तयाचे पालन करणं म्हणजे निसर्गाशी सुसंगत अस जीवन जगन होय . आपल् मन बुद्धी हेच निसर्गाशी सुसंगत आणि विसंगत कृती करण्याची मानसिकता निर्माण करत म्हणून मन बुद्धी हि निसर्गाशी सुसंगत करण्याची ताकद शक्ती आपण निर्माण करणं गरजेचं आहे .हि शक्ति प्रेरणा अध्यात्मिक ज्ञाना मधुन सहज मिळु शकते . आणि हे अध्यात्मिक ज्ञान जीवनात संजीवनी ठरते .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301