दै.चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
▪️राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. या प्रकारामुळे औरंगाबादेतील वातावरण तापण्याची शक्यता
▪️औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात.
▪️ एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवाच, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे