दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : तुम्हीही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. ‘एचसीएल टेक’ या टेक क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असून, जागतिक पातळीवर मोठी कोस्ट कटिंगचा निर्णय घेण्यात आला आहे.
एचसीएल टेक्नॉलॉजीजने सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासह ग्वाटेमाला आणि फिलिपिन्समधील कर्मचारी या नोकर कपातीमध्ये सहभागी आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर या 350 कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर रोजी असणार आहे.
मंदीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज आयटी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टच्या वृत्ताशी संबंधित प्रोजेक्टवर काम करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. मंदीमुळे कंपनीचे प्रोजेक्ट निघून जातं आहेत.
जागतिक पातळीवर वाढत्या महागाईची चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात आयटी क्षेत्रासाठी अतिशय कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने टाऊन हॉलच्या बैठकीत या टाळेबंदीची माहिती दिली आहे. सध्या तरी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आर्थिक दबावाचा सामना करणाऱ्या कंपन्या :
मीडिया रिपोर्टनुसार, एचसीएल टेक्नॉलॉजीज व्यतिरिक्त जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांना आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे. टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस या बड्या कंपन्यांसाठीही कंपनीची ही कारवाई चिंतेची बाब आहे.