दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
सामंथा चा ‘यशोदा’ चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती आणि आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात अभिनेत्री सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसत आहे. अॅक्शनसोबत भावनांचा सुरेख मेळ या चित्रपटात पाहायला मिळत आहे, तसेच अभिनेत्रीचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दरम्यान, चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शनही चांगले केलं आहे.
‘यशोदा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या समंथा प्रभूच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमुळे निर्मात्यांना दिलासा मिळू लागला आहे. चित्रपटाने ओपनिंग डे ला 3.20 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी, प्री-रिलीज दरम्यानही चित्रपटाने बंपर कमाई केली होती. ‘यशोदा’नं आधीच ओटीटी आणि सॅटेलाइटद्वारे 55 कोटींची कमाई केली. म्हणजेच निर्मात्यांनी या चित्रपटाची किंमत आधीच वसूल केली असून आता बॉक्स ऑफिसवर कमाई सुरु आहे.
‘यशोदा’नं 3.20 कोटी रुपयांची कमाई सर्व भाषांमध्ये आहे. आता निर्मात्यांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांच्या नजरा शनिवार-रविवारच्या कलेक्शनवर खिळल्या आहेत. या दोन दिवसांतही चित्रपटाची कमाई चांगली झाली, तर ‘यशोदा’ला हिट होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
‘यशोदा’ चे दिग्दर्शन हरीश नारायण आणि के. हरिशंकर यांच्या जोडीने केली आहे. ‘यशोदा’ व्यतिरिक्त समंथा रुथ प्रभू तिच्या ‘शाकुंतलम’ आणि ‘कुशी’ या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. शकुंतलम हा कालिदासाच्या प्रसिद्ध नाटक शकुंतलावर आधारित पीरियड ड्रामा चित्रपट आहे.