दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर अभिनेता शाहरुख खानला त्याच्या मॅनेजर पूजा ददलानी सोबत पकडण्यात आले. त्यांची जवळ जवळ तासभर चौकशी झाली. दरम्यान शाहरुखच्या अंगरक्षकालाही तब्यत घेतल्याचे समजते.
लाखो रुपयांच्या घड्याळाचे बॉक्स त्याच्या बॅगेत सापडल्याचे समजते. तसेच ही घड्याळे अनधिकृत रित्या भारतात आणल्याचे स्पष्ट झाले आई. या घड्याळावर कस्टम ड्युटी न भरल्या कारणाने त्याची चौकशीय करण्यात आली.
शाहरुख खान खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईत पोहोचला. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शाहरुख खान आणि त्याची टीम टी-3 टर्मिनल येथे रेड चॅनल पार करत असताना कस्टम्सने अडवले. त्याच्या बॅगेत Babun & Zurbk , रोलेक्स घड्याळाचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडचे घड्याळ, ॲपल सिरीजची घड्याळे आढळून आली. यासोबत घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले.
कस्टम्सने या घड्याळांचे इव्हॅल्यूएशन केले, त्यानंतर त्याच्यावर 17 लाख 56 हजार 500 रुपये कस्टम ड्युटी लावण्यात आली. यानंतर कोट्यवधी रुपयांच्या या घड्याळांवर लाखो रुपयांचा कर भरावा, असे सांगण्यात आले. तासाभराच्या प्रक्रियेनंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली मात्र शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी आणि टीममधील सदस्यांना येथेच थांबवण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान त्याच्या टीमसोबत एका खासगी चार्टर्ड विमानाने दुबईला एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. या विमानाने तो शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता मुंबईला परतला. शाहरुख 11 नोव्हेंबरला UAE मधील एक्स्पो सेंटरमध्ये पोहोचला होता. शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर 2022 च्या 41 व्या एडिशनमध्ये भाग घेतल्याबद्दल त्याला तेथे ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा आणि कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.