दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन फुलंब्री विधानसभेतील औरंगाबाद तालुक्यातील पूर्व विभागातंर्गत येत असलेल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या दि २६ मे रोजी जाहीर करण्यात आल्या. मागील बऱ्याच महिन्यांपासून तालुक्यातील संघटनात्मक पदे रिक्त होते. त्यानुषंगाने तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे यांनी दानवे यांची भेट घेऊन ही माहिती दिली होती. त्यानंतर आज पदाधिकाऱ्यांची उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे व शंकर ठोंबरे, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप उपतालुकाप्रमुख गणेश नवले यांच्या उपस्थितीत नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
यावेळी नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना दानवे म्हणाले की,जिल्ह्यात अतिवृष्टी,सततधार पाऊस,गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाकडून याची नुकसान भरपाई सुद्धा मिळालेली नाहीत.यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याला धीर देणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला गेला पाहिजे.
तसेच नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला शिंदे फडणवीस सरकार संदर्भातला निकाल गावागावात जाऊन चावडीवर वाचून दाखवा. याव्यतिरिक्त आगामी काळात समाजातील सर्व वर्गांचे संघटन करुन शिवसेनेची मोठी ताकद निर्माण करा. संघटनात्मक कामकाजासाठी तुमच्या अधिकाराखाली येणाऱ्या सर्व पदांच्या नियुक्त्या लवकरात लवकर करा,असे आवाहन दानवे यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.
दरम्यान,यावेळी अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.तालुकाप्रमुख पदी दत्तात्रय उकर्डे, बाळासाहेब भोसले, किसान सेना तालुकाप्रमुख मदनराव चौधरी, उपतालुकाप्रमुख किसान सेना दगडू मते, करमाड शहर प्रमुख भास्कर तारो, उपशहर प्रमुख विनायक उकर्डे, कामगार सेना उपतालुकाप्रमुख सोपान ठोंबरे, युवा सेना उपअधिकारी तुकाराम कोरडे, सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख भगवान गाडेकर, विभागप्रमुख राजु ठोंबरे, किसान सेना विभाग प्रमुख बंडू पंगुळे, उपतालुकाप्रमुख मारोती आगळे, उपविभाग प्रमुख मल्लिनाथ साळुंखे, दलित सेना आघाडी उपजिल्हाप्रमुख सुरेश नाडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव, उपतालुकाप्रमुख जालिंदर कचकुरे, मीडिया तालुकाप्रमुख मोहन मुळे, किसान सेना विभागप्रमुख सांडू रोडे, मीडिया विभाग प्रमूख केशव पळसकर, टॅक्स युनियन अध्यक्ष शकील पठाण, करमाड सोशल मीडिया प्रमुख शिवाजी उकर्डे, विभाग प्रमुख नारायण मुळे, उपविभाग प्रमुख साडू मते व सुभाष गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.