
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
काबूल / नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. 6.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये सुमारे 920हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
तर 600हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भूकंपात अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानमध्येही अनेक भागात विध्वंस झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून 40 किमी अंतरावर होता. या भूकंपाचा प्रभाव 500 किमीच्या अंतरापर्यंत जाणवला होता.